
नागपूर – दिनांक ३ जुलै २०२५ रोजी नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालय, नक्षत्र भवन, प्रतापनगर येथे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अम्मोल देवाजी वालके, प्रदेश प्रभारी – भाजप दिव्यांग विकास आघाडी, यांना अधिकृतरित्या काम करण्याची संधी व परवानगी प्राप्त झाली.
ही संधी त्यांना महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विशेष कृपेने,
मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मा. श्री सुनील मित्रा साहेब आणि
नागपूर दक्षिणचे माजी आमदार मा. श्री सुधाकरराव कोहले साहेब यांच्या सहकार्याने मिळाली.
या भेटीदरम्यान, अम्मोल वालके यांनी राज्यातील दिव्यांग बांधवांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक व रोजगारविषयक समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावर मा. मित्रा साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे, अम्मोल वालके हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्मरेसलिंग (पंजा कुस्ती) क्रीडापटू देखील आहेत, हे कळताच मा. मित्रा साहेबांनी त्यांच्या क्रीडास्फूर्तीचे कौतुक केले. या भेटीने दिव्यांग क्रीडापटूंना देखील नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या विशेष क्षणी डॉ. राजू राऊत साहेब देखील उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे चर्चेचे स्वरूप अधिक परिणामकारक झाले.
अम्मोल वालके यांनी मुख्यमंत्री, श्री. मित्रा साहेब आणि श्री. कोहले साहेब यांचे मनापासून आभार मानले असून, येत्या काळात नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.